Outdoor Training
- पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे पोलीस उपनिरीक्षक, नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार, होमगार्ड, महाराष्ट्र सागरी तांत्रिक दल, महाराष्ट्र सुरक्षा बल याना मूलभूत प्रशिक्षण देण्यात येते. त्यानां पुढील प्रमाणे बाहयवर्ग प्रशिक्षण देण्यात येते.
- महिला व पुरुष पोलिस अंमलदारसाठी इनडोअर आणि आउटडोअर मूलभूत प्रशिक्षण 09 महिन्यांच्या कालावधीसाठी दिले जाते. प्रशिक्षणार्थी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्हयामधील नियुक्त सर्व प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षणार्थी किमान 12 वी उत्तीर्ण असतात तसेच काही प्रशिक्षणार्थी पदवीधर/ पदव्युत्तर पदवीधर आहेत. मुळात ते निम्न मध्यमवर्गीय आणि शेतकरी कुटुंबातील असतात, तसेच त्यापैकी काही अनुकंपा तत्वावरती भरती झालेले आणि काही माजी सैनिक प्रवर्गामधून असे प्रशिक्षणार्थीही प्रशिक्षणास येत असतात. या सर्वाना सर्व क्षेत्रांतील विविध गुन्हे तसेच कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक ते योग्य प्रशिक्षण दिले जाते.
- नव्याने भरती झालेल्या पोलिस अंमलदार नऊ महिन्यांच्या मूलभूत प्रशिक्षणादरम्यान त्यांना मैदानी प्रशिक्षण अभ्यासक्रम, शारीरिक व्यायाम जसे की धावणे, फिझीकल ट्रेनिंग (P.T.), ऑब्स्ट्रॅकल्सस , शस्त्रांचे डावपेच, मार्च पास, सेल्फ डिफेन्स, मॉब डिस्पर्सल आणि औपचारिक परेडचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांना पारंपारिक पोलिस विषयांचे प्रशिक्षण दिले जाते जसे विविध शस्त्रे वापरून विविध रेंजवर गोळीबार करणे, जमाव पांगवणे, गस्त घालणे, क्लोज कॉम्बॅट फाईट, जंगल प्रशिक्षण आणि पोलिस कॉन्स्टेबलची इतर विविध कर्तव्ये जी मैदानावर पार पाडायची आहेत. त्या अनुषंगाने त्याच्या अभ्यासक्रमामध्ये विषयांचा व प्रात्यक्षिकांचा अंतर्भाव केलेला आहे.