Indoor Training
- पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे पोलीस उपनिरीक्षक, नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार, होमगार्ड, महाराष्ट्र सागरी तांत्रिक दल, महाराष्ट्र सुरक्षा बल याना मूलभूत प्रशिक्षण देण्यात येते. त्यानां पुढील प्रमाणे आंतरवर्ग प्रशिक्षण देण्यात येते.
- महिला व पुरुष पोलिस अंमलदारसाठी इनडोअर आणि आउटडोअर मूलभूत प्रशिक्षण 09 महिन्यांच्या कालावधीसाठी दिले जाते. प्रशिक्षणार्थी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्हयामधील नियुक्त सर्व प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षणार्थी किमान 12 वी उत्तीर्ण असतात तसेच काही प्रशिक्षणार्थी पदवीधर/ पदव्युत्तर पदवीधर आहेत. मुळात ते निम्न मध्यमवर्गीय आणि शेतकरी कुटुंबातील असतात, तसेच त्यापैकी काही अनुकंपा तत्वावरती भरती झालेले आणि काही माजी सैनिक प्रवर्गामधून असे प्रशिक्षणार्थीही प्रशिक्षणास येत असतात. या सर्वाना सर्व क्षेत्रांतील विविध गुन्हे तसेच कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक ते योग्य प्रशिक्षण दिले जाते.
- आमच्याकडे इनडोअर प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण भवन येथे 10 सुसज्ज वर्गखोल्या आहेत. त्यामध्ये एका वेळी 500 प्रशिक्षणार्थी बसू शकतात. या सर्व वर्गात एलईडी टीव्ही स्क्रीनसह मल्टीमीडिया प्रोजेक्टर, इंटरनेट कनेक्टिविटी या सोयीसह सुसज्ज आहेत.
- या सर्व वर्गखोल्या चांगल्या प्रकारे डिझाइन केलेल्या आणि हवेशीर आहेत. त्यामध्ये ग्रीन बोर्ड, माहिती देणारे फलक, सूचनापेठी, वर्तमानपत्र, संगणक कक्ष, AMBIS रूम, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि प्रत्येक मजल्यावर शौचालय या सुविधा आहेत. या सर्व वर्गखोल्या मध्ये व्हर्च्युअल क्लासरूमसाठी आवश्यक साधन सामुग्री पुरवण्यात आलेली आहेत.
Model Police Station
- प्रशिक्षणार्थीना शिकवण्यात येणारे कायदे प्रत्यक्षात कसे वापरावेत याचे ज्ञान देण्याकरिता प्रशिक्षण भवन येथे, वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या घटनास्थळांचे Crime scene तयार करण्यात आले असून, त्याचा साहाय्याने प्रशिक्षणार्थी प्रात्यक्षिक ज्ञान देण्यात येते.
- प्रत्यक्षात पोलीस स्टेशनचे काम कसे चालते याचे ज्ञान देण्याकरिता पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये मॉडेल पोलीस स्टेशन करण्यात आले असून त्यामधून पोलीस स्टेशन मधील दैनंदिन कामकाज कसे चालते याबाबत प्रशिक्षणार्थींना प्रात्यक्षिक ज्ञान दिले जाते. दैनंदिन कामकाज करत असताना इतर शासकीय कार्यालयाशी येणारा संबंध याबाबत माहिती देण्याकरिता सदर ठिकाणी भेटी आयोजित करण्यात येतात.
- प्रशिक्षणा दरम्यान आपण प्रशिक्षणार्थींना अभ्यासक्रमामध्ये पोलीस ठाण्याच्या कामकाजाबद्दल माहिती देत असतो. परंतु त्यांना प्रत्येक्षात कामकाज कसे चालते हे लक्षात येत नाही त्यामुळे, सदर ठिकाणी प्रशिक्षणार्थींना ज्या पद्धतीने बाहेर पोलीस स्टेशनला तपासाचे कामकाज चालते त्या पद्धतीने प्रशिक्षणार्थीकडून कामकाज करून घेतले जाते. त्यामध्ये त्यांना एक घटना दिली जाते. वेगवगळ्या प्रशिक्षणार्थींना पोलीस ठाण्यातील पदानुसार कर्तव्य वाटप केले जाते त्यांना पोलीस ठाण्यातील पदाची कर्तव्य समजावून सांगलीतली जातात, तसेच त्यांच्याकडून FIR तयार करणे, घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा तयार करणे, आरोपी अटक करणे, त्याचबरोबर सदर गुन्ह्याच्या कामकाजाची वेगवेगळ्या रजिस्टरमध्ये नोंद घेणे,अशा पद्धतीने काम चालवले जाते. तसेच सदर प्रशिक्षणार्थींना त्यांना दिलेली घटनेचा डेमो दिला जातो उदाहरणार्थ Chain Chasing, अपघात इत्यादी.
- गुन्ह्याच्या घटना स्थळी पोलीस अमंलदारानी पोहोचल्यावरती कोणती काळजी घावी व कशा पद्धतीने पुरावे गोळा करावे यासाठी
गुन्ह्याची घटना स्थळे तयार करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये प्रशिक्षण भवन येथे संगणक कक्षाच्या बाजूला सायबर क्राईम आणि कक्ष 03 समोर अपहरण व खून, मॉडेल पोलीस स्टेशन जवळ गळफास, आणि फुटबॉल ग्राउंड वर अपघात अशा चार गुणांची घटना स्थळे तयार करण्यात आली आहेत.