विशाखा समिती बैठक

विशाखा समिती बैठक

विशाखा समिती म्हणजे, कामाच्या ठिकाणी महिलांना लैंगिक छळ होऊ नये यासाठी स्थापन केलेली समिती. सर्वोच्च न्यायालयाच्या विशाखा जजमेंटच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही समिती स्थापन केली जाते.

*विशाखा समितीचे काम:*
• महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वाटावे यासाठी काम करणे
• महिलांना लैंगिक छळ होऊ नये यासाठी काम करणे
• लैंगिक छळाच्या प्रकरणांची चौकशी करणे
• लैंगिक छळाच्या प्रकरणांमध्ये सलोखा करण्यासाठी पावले उचलणे
• लैंगिक छळाच्या प्रकरणांमध्ये पीडित महिलांना न्याय मिळवून देणे.

त्या अनुषंगाने माननीय प्राचार्य धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे विशाखा समिती स्थापन करण्यात आलेली असून दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी सदर विशाखा समितीची मासिक बैठक पोलीस निरीक्षक तथा सत्र समन्वयक श्रीमती मुलानी मॅडम, पोलीस निरीक्षक विद्या जाधव मॅडम, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. सदरवेळी बैठकीस पोलीस प्रशिक्षण केंद्रामधील महिला प्रशिक्षणार्थी हजर होत्या.

error: Content is protected !!