प्रजासत्ताक दिन कार्यक्रम

प्रजासत्ताक दिन कार्यक्रम

दिनांक 26/01/2025 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे ध्वजवंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमावेळी मा. प्राचार्य श्री धीरज पाटील सर ह्यांचे शुभहस्ते ध्वजवंदन करण्यात आले. सदरवेळी उपस्थित सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार व प्रशिक्षणार्थी यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांनी उपस्थित अधिकारी अंमलदार व प्रशिक्षणार्थी यांना प्रजासत्ताकदिनाचे महत्त्व सांगून संबोधित केले व प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सदरवेळी राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात येणाऱ्या प्लाटून चे नेतृत्व राखीव पोलिस निरीक्षक श्री शर्मा यांनी केले. सदर कार्यक्रमास उपप्राचार्य (प्रशासन) श्रीमती राजश्री पाटील मॅडम, उपप्राचार्य प्रशिक्षण श्री सुनील शेटे सर, सत्र समन्वयक श्रीमती मुलाणी मॅडम, मंत्रालयीन कर्मचारी व प्रशिक्षणार्थी हजर होते.

error: Content is protected !!