पोलीस क्रीडा स्पर्धा 2025

पोलीस क्रीडा स्पर्धा 2025

दिनांक 25 ते 28 मार्च 2025 या कालावधीत पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची मधील प्रशिक्षणार्थी महिला पोलीस अंमलदार यांच्या क्रीडा स्पर्धा पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची चे प्राचार्य मा. धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. सदर क्रीडा स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली उपस्थित होते. सदर वेळी नमूद क्रीडा स्पर्धेतील विजेत्या प्रशिक्षणार्थी यांना प्रमुखातिथी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन श्रीमती राजश्री पाटील उपप्राचार्य (प्रशासन) यांनी केले. सदर वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी तासगाव, पोलीस निरीक्षक तासगाव, तहसीलदार तासगाव त्याचबरोबर तुरची ग्रामपंचायत सरपंच उपस्थित होते सदर कार्यक्रमाची क्षणचित्रे पुढीलप्रमाणे

error: Content is protected !!