पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची च्या वतीने, दत्तक गाव योजने अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांनी बाबासाहेब पाटील विद्या मंदिर, येळावी येथे भेट दिली.
दिनांक 12/08/2023 रोजी मा.प्राचार्य श्री.धीरज पाटील सर व उपप्राचार्य श्री.उदय डुबल सर ह्यांचे मार्गदर्शनानुसार, पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची च्या वतीने, दत्तक गाव योजने अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांनी बाबासाहेब पाटील विद्या मंदिर, येळावी येथे भेट दिली व विध्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक मानसिंग डुबल यांनी वाहतुकीचे नियम याबाबत, सहायक पोलिस निरीक्षक वैशाली कोरे यांनी पोक्सो अधिनियम बाबत, पोलीस उपनिरीक्षक सीमा बडे यांनी Good touch, bad touch व अल्पवयीन मुलांचे अपहरण याबाबत, पोलीस उपनिरीक्षक स्वेताली सुतार यांनी किशोरवयीन मुलांमध्ये होणारे बदल व वर्तन याविषयावर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास एकूण 588 विध्यार्थी हजर होते. सदरची माहिती विध्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात उपयोगी ठरेल अशी प्रतिक्रिया सदर कार्यक्रमास उपस्थित मुख्याध्यापक व शिक्षकांनी दिली.