नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार सत्र क्रमांक 08 चा उदघाटन कार्यक्रम.
दिनांक 06/06/2023 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार सत्र क्रमांक 08 चा उदघाटन कार्यक्रम पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरचीचे प्राचार्य, श्री. धीरज पाटील सर ह्यांचे उपस्थितीत संपन्न झाला. सदर प्रशिक्षण सत्र दिनांक 04/06/2023 रोजी पासून सुरू झाले असून त्यामध्ये ठाणे शहर व मुंबई लोहमार्ग येथे भरती झालेले एकुण 600 नवप्रविष्ठ पुरुष पोलीस अंमलदारांचा समावेश आहे. सदर उदघाटन कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य श्री धीरज पाटील सर, उपप्राचार्य प्रशासन श्री उदय डुबल सर, उपप्राचार्य प्रशिक्षण श्री सुजय घाटगे सर सत्र समन्वयक श्री श्रीकृष्ण हारुगडे सर व प्रशिक्षणार्थी ह्यांचे शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. सर्व प्रशिक्षणार्थीना त्यांच्या आंतरवर्ग पालक अधिकाऱ्यांची, बाह्यवर्ग अधिकारी व प्रशिक्षक ह्यांची ओळख करून देण्यात आली. प्राचार्य श्री धीरज पाटील सर ह्यांनी नवप्रविष्ठ पोलीस अंमलदारांना प्रशिक्षणाबाबत संबोधित करून प्रशिक्षण कालावधीत शिस्तीचे पालन करून, सचोटी प्रशिक्षण पूर्ण करण्याबाबत मार्गदर्शन केले.