वीर बाल दिवस
वीर बाल दिवस 26 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस बाबा फतेह सिंग आणि बाबा जोरावर सिंग, गुरु गोबिंद सिंग जी यांचे लहान पुत्रांच्या शौर्य आणि बलिदानाची आठवण करून देतो. हे दोन्ही बालक अत्यंत लहान वयात असतानाही त्यांनी धर्म आणि तत्त्वज्ञानाच्या रक्षणासाठी प्रचंड शौर्य दाखवले आणि हौतात्म्य पत्करले. साधारणपणे 1704 मध्ये, बाबा फतेह सिंग आणि बाबा जोरावर सिंग यांना मुघल साम्राज्याच्या सैन्याने पकडले आणि त्यांच्या अत्याचारांना तोंड दिले, तरीही ते कधीही आपल्या धर्मापासून मागे हटले नाहीत. या दोन्ही शूर बालकांनी अत्यंत निडरपणे आणि धैर्याने आपले जीवन अर्पण केले, आणि त्यांच्या बलिदानामुळे लाखो लोकांना प्रेरणा मिळाली.
वीर बाल दिवस हा दिवस त्यांच्या साहसाचे, शौर्याचे आणि बलिदानाचे स्मरण करणारा आहे. त्या अनुषंगाने पोलीस ट्रेनिंग सेंटर तुरची या ठिकाणी माननीय प्राचार्य धीरज पाटील सर यांच्या उपस्थितीत वीर बाल दिवस साजरा करण्यात आला सदर वेळी पोलीस ट्रेनिंग सेंटर तुरची मधील अंतर वर्ग तसेच बाह्यवर्ग अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.