रेझिग डे

२ जानेवारी 1961 महाराष्ट्र पोलीस विभागास, महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज सुपूर्त केला होता. त्यादिना निमित्य महाराष्ट पोलीस विभागाच्या वतीने २ जानेवारी हा दिवस रेझिग डे म्हणून साजरा केला जात आहे. तसेच २ जानेवारी ते ८ जानेवारी हा रेझिग डे सप्ताह साजरा केला जात आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरीची केंद्र कडून विविध शाळा व नागरिक याना पोलीस दलातील विविध विभाग व महत्वाचे कायदे यांची माहिती दिली जाते.

रक्तदान शिबीर

पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये विविध कार्यक्रमानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. पोलीस दलात नवीन भरती होणाऱ्या पोलिसांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण होण्यासाठी रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात.

वृक्षारोपण

पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची हे पर्यावरण पूरकतेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून उदयास आलेले प्रशिक्षण केंद्र आहे. यामध्ये आणखी भर घालण्यासाठी प्रशिक्षण केंद्र व आजूबाजूच्या गावांमध्ये वेळोवेळी वृक्षारोपण केले जाते.

रॉबिन हूड आर्मीला खारीचा वाटा.

रॉबिन हूड आर्मी एक जागतिक दर्जाची संस्था जी सामाजिक तसेच गरीब गरजू लोकांसाठी व अनाथ मुलांसाठी काम करते त्यांना एक मदतीचा हात म्हणून पोलीस प्रशिक्षण केंद्राकडून कपडे व खेळाच्या वस्तू देण्यात आल्या.

कोविड जनजागृती

जागतिक महामारी दरम्यान नागरिकांमध्ये कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अफवा व अज्ञानामुळे चुकीचा संदेश पसरला जात होता अशा वेळेस पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे अधिकारी व अंमलदार यांनी परिसरातील गावांमध्ये जाऊन नागरिकांमध्ये कोरोना विरुद्ध लढा कसा द्याचा आहे याचे ज्ञान व नागरिकांना शपथ दिली.

अपंग मुलांनी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुर्ची येथे भेट दिली

पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची, येथे दिनांक 13/03/2023 रोजी , सांगली मिशन सोसायटी, आस्था एकात्मता व सर्वसमावेशक सक्षमीकरण केंद्र सांगली, ह्यांच्या मार्फतीने दिव्यांग मूलामुलींची प्रशिक्षण केंद्रास भेट आयोजित करण्यात आली होती. सदर भेटीस सांगली जिल्ह्यातील 15 गावांमधील केंद्रामधून एकूण 45 दिव्यांग मुले मुलीं सहभागी होते. त्यांना प्रशिक्षण केंद्राची माहिती देऊन प्रशिक्षण केंद्रामधील क्लासरूम, खेळाची मैदाने, मेस, शस्त्रागार, कवायत मैदान, प्रशिक्षण भवन, तक्षशिला ग्रंथालय ह्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट व प्रत्येक ठिकाणची सविस्तर माहिती देण्यात आली, तसेच सदर मुलामुलीच्या चहापाणाची व्यवस्था करण्यात आली. सदर भेटीमुळे दिव्यांग मुलामुलींच्या ज्ञानात भर पडेल अशी प्रतिक्रिया त्यांचे शिक्षकांनी दिली. सदर भेटीमुळे दिव्यांग मुलामुलींना आनंद झाला होता.

पोलीस कुटुंबीय यांच्याकरिता मोफत दंतचिकित्सा व साहित्य वाटप शिबिर.

दिनांक 17/03/23 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे भारती विद्यापीठ , दंत महाविद्यालय आणि रुग्णालय, सांगली ह्यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस प्रशिक्षण केंद्र मधील पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच पोलीस कुटुंबीय यांच्याकरिता मोफत दंतचिकित्सा व साहित्य वाटप हे शिबिर आयोजित करण्यात आले होते . सदर शिबिरास 250 पोलीस अधिकारी , अंमलदार व कुटुंबीय ह्यांनी हजर राहून त्याचा लाभ घेतला