महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणाऱ्या ज्या पोलिस अंमलदारांची सेवा दहा वर्ष पूर्ण झालेली आहे अशा पोलीस अंमलदारांकरीता दैनंदिन कामकाज करत असताना, कायदेशीर बाबीचे संपूर्ण ज्ञान होऊन त्यांनी पोलीस दलास गुणवत्तापूर्ण सेवा देण्याकरिता व्यावसायिक कौशल्य विकास प्रशिक्षण हे प्रशिक्षण सत्र माननीय पोलीस महासंचालक सो, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशाने आयोजित करण्यात आले असून सदर प्रशिक्षणास PSU-I ( Professional Skill upgradation-I ) असे म्हटले जाते. PSU-I  ची 2 सत्रे पूर्ण झालेली असून त्या मध्ये एकूण ४८२ अंमलदारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणचा कालावधी 13 दिवसांचा आहे.