रिडींग हब

सातारा जिल्ह्यातील भिलार पुस्तकांचे गाव इथून प्रेरणा घेतली आहे. वाचन संस्कृती रुजवण्यासाठी, तरुणांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी वयोवृद्धांमध्ये नवी उमेद निर्माण करणे, बालकांमध्ये वाचन संस्कृती रुजवणे, मनोरंजना बरोबर साहित्यिक ज्ञानात व माहितीत भर घालणे. प्राध्यापक बाबा नाईक यांच्या सहाय्याने व सत्र क्रमांक ६ मधील प्रशिक्षणार्थी यांच्या श्रम दानातून हे रिडींग हब तयार करण्यात आले आहे. या रिडींग हब मध्ये ऑडिओ बुक व मोटिवेशनल ऑडिओ उपलब्ध आहेत. याचा वापर पोलीस प्रशिक्षणार्थी, अधिकारी, अंमलदार व त्याचे कुटूंबीय करतात.