आमच्या विषयी पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची (तासगांव )

पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची हे सन 2007 पासुन कार्यान्वित झालेले आहे. सदरचे प्रशिक्षण केंद्र सांगली पासुन 33 कि.मी. अंतरावर आणि तासगांव पासून 11 कि.मी. अंतरावरील, तुरची गावाच्या 62.50 एकर जमिनीवर विकसित केलेले आहे. सदर प्रशिक्षण केंद्रास राज्यातील पहिला ग्रो-ग्रिन व एनर्जी सेव्हींग प्रकल्प असलेचा मान प्राप्त झालेला असून, या प्रकल्पातुन निर्माण होणारे सांडपाणी हे एस.आय.बी.एफ. सिस्टीमव्दारे प्रक्रिया करुन परिसरातील वृक्षसंवर्धानासाठी आणि जमीन पुर्नभरणासाठी वापर करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण 08 प्रशिक्षण सत्रे पार पडली असून, त्यामध्ये 3644 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे, त्यापैकी पोेलीस उपनिरीक्षक मुलभूत प्रशिक्षणाची तीन सत्रे पार पडली असून, त्यामध्ये 797 प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक व पोलीस शिपाई यांची एकूण 05 सत्रे पार पडली असून त्यामध्ये एकूण 2847 पोलीस प्रशिक्षणार्थीना मुलभूत प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. सध्या दि. 11/01/2021 पासुन नवप्रविष्ठ पोलीस कर्मचारी सत्र क्र.6 चे एकुण 247 प्रशिक्षणार्थी यांचे प्रशिक्षण चालु आहे. प्रशिक्षणार्थी यांना उत्कृष्ट प्रशिक्षण देण्यासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथील आंतरवर्ग व बाहयवर्ग पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी महाराष्ट्रातील पोलीस कर्मचारी यांची एक उत्कृष्ट नवी पिढी निर्माण करण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये पर्यावरण पूरक विविध कार्यक्रम हाती घेतलेली असून त्यामध्ये गांडूळ खत प्रकल्प, 2.5 कोटी लिटर पाणी क्षमतेचे शेततळे, वॉटर ॲन्ड रेन हार्वेस्टींग, कंटूर बंडिग व वॉटर कप निर्मितीद्वारे जलपुनर्भरण, एसआयबीएफ प्लँट, अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांच्या वापरामध्ये पवनचक्की, सॉलर पॉवर इत्यादी बाबत या प्रशिक्षण केंद्रास राज्यातील पहिला ग्रो-ग्रिन व एनर्जी सेव्हींग प्रकल्प असलेचा मान प्राप्त झालेला आहे, व तसेच समाजिक वनीकरण विभागाकडून वनश्री पुरस्कार प्राप्त झालेला आहे. केंद्र सरकार कडून फोर स्टार रेटींग प्राप्त झालेले आहे. या प्रशिक्षण केंद्राची स्मार्ट पीटीसी म्हणून निवड करण्यात आलेली आहे.​

0

पी.टी.सी ची यशस्वी पूर्ण सत्र

0

पोलीस उप-निरीक्षक प्रशिक्षण पूर्ण

0

पोलीस शिपाई प्रशिक्षण पूर्ण

0

गृहरक्षक दल (होमगार्ड) प्रशिक्षण पूर्ण

माजी प्राचार्य, ज्योती क्षीरसागर

जुन २०१९  ते  नोव्हेंबर २०२२ 

आम्ही या क्षेत्रात सर्वोत्तम आहोत

पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची हे समृद्ध निसर्ग आणि पर्यावरण पूरकतेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून उदयास  आलेले प्रशिक्षण केंद्र आहे. येथे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मानसिक, शारिरिक आणि भावनिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली जाते. या ठिकाणी दिले जाणारे प्रशिक्षण हे बदलत्या विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्याशी सांगड घालून दिले जात आहे. तसेच बदलत्या जीवनशैलीनुसार सामाजिक आर्थिक परिस्थितीनुसार वेगवेगळे प्रशिक्षणे त्यामध्ये समाविष्ट करण्यात येते आहेत. जीवनमूल्य, आनंदी जीवनशैली व संतुलित जीवनशैली याबाबतही त्यांना प्रशिक्षण दिले जाते.

सर्वात शेवटी मला या प्रशिक्षणार्थींना काही सांगायचं असेल तर बदलत्या परिस्थितीनुसार प्रशिक्षणार्थीं स्वतःमध्ये बदल करून स्वतः समृद्ध बनवण्याचा प्रयत्न करावा.

“तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार”

माजी प्राचार्य, मा. श्री. संजयकुमार बारकुंड

जुलै २०१६ ते  जुन २०१९

माजी प्राचार्य, मा. श्री. दिलीप भुजबळ

मार्च २०१४  ते  मे २०१६

माजी प्राचार्य, मा. श्री. सुरेश मेंगडे

ऑक्टोबर २०१० ते मार्च २०१४

Our Team प्रशिक्षक अधिकारी

संजय गिड्डे

पोलीस निरीक्षक

श्रीकृष्ण हारुगडे

पोलीस निरीक्षक

संजय पाटील

पोलीस निरीक्षक

सुरज मुलाणी

पोलीस निरीक्षक

धनंजय मोरे

पोलीस निरीक्षक

रेश्मा मुलाणी

पोलीस निरीक्षक

रवींद्र भंडारे

पोलीस निरीक्षक

बयाजी कुरळे

पोलीस निरीक्षक

धनाजी पिसाळ

सहाय्यक पोलीस निरीक्षक

शैलेश शिंदे

सहाय्यक पोलीस निरीक्षक

नंदाताई पाटील

सहाय्यक पोलीस निरीक्षक

वैशाली कोरे

सहाय्यक पोलीस निरीक्षक

मदन शिसाळ

सहाय्यक पोलीस निरीक्षक

ज्ञानेश्वर पाटील

सहाय्यक पोलीस निरीक्षक

रोहन दणाणे

पोलीस उप-निरीक्षक

अजित भोसले

पोलीस उप-निरीक्षक

विक्रांत पाटील

पोलीस उप-निरीक्षक

विक्रांत संकपाळ

पोलीस उप-निरीक्षक

श्वेताली सुतार

पोलीस उप-निरीक्षक

विठ्ठल माने

पोलीस उप-निरीक्षक

सुरेश गवई

राखीव पोलीस निरीक्षक

शरद बारावकर

राखीव पोलीस निरीक्षक

आनंदा वरेकर

राखीव पोलीस निरीक्षक

विजय बाविस्कर

राखीव पोलीस निरीक्षक

राजू शिंदे

राखीव पोलीस निरीक्षक

रामदास मिसाळ

राखीव पोलीस उप-निरीक्षक

चंद्रकांत भोसले

राखीव पोलीस उप-निरीक्षक

अरुण कंठीवार

राखीव पोलीस उप-निरीक्षक

बाबासो लाड

राखीव पोलीस उप-निरीक्षक

अनिल बावस्कर

राखीव पोलीस उप-निरीक्षक

तानाजी भोसले

राखीव पोलीस उप-निरीक्षक

मोहन ठोंबरे

राखीव पोलीस उप-निरीक्षक