Infrastructure
कॉम्पुटर लॅब
पोलीस प्रशिक्षण केंद्र,तुरची या ठिकाणी प्रशिक्षण भवन येथे सुसज्ज अशी कॉम्प्युटर लॅब असुन, त्यामध्ये इंटरनेट कनेक्टव्हीटी, प्रोजेक्टर, या सारख्या सुविधा पुरविण्यात आलेले आहेत. त्यामध्ये साधारणत ०१ स्कॉड प्रमाणे २५ प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेवू शकतात.
बहुउद्देशीय हॉल
प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षणार्थीकरीता संगणककक्ष, अभ्यासिका कक्ष, वाचनालय, बहु उद्देशीय हॉल उपलब्ध आहेत. तसेच, एकत्रित आंतरवर्ग प्रशिक्षणाकरीता बहुउद्देशीय हॉल असून त्या ठिकाणी १००० ते १२०० प्रशिक्षणार्थीची बैठक व्यवस्था आहे. बहुउद्देशीय हॉल येथे वरिष्ठ अधिकारी आणि विषय तज्ञ यांचे प्रशिक्षण केंद्राकडील सर्व प्रशिक्षणार्थी आणि अधिकारी यांचेकरीता व्याख्यान आयोजित केले जाते. तसेच पोलीस कल्याणकारी उपक्रमातंर्गत विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
बाह्यवर्ग प्रशिक्षण
पोलीस प्रशिक्षण केंद्र तरची तासगाव येथे नवप्रविष्ट पोलीस शिपाई यांचे मुलभूत प्रशिक्षण दिले जाते. नवप्रविष्ठ पोलीस शिपाई यांची एकूण ५८० गुणांची बाहयवर्ग परीक्षा घेण्यात येते. सदर परिक्षेमध्ये पास होण्याकरीता ५०% गुण प्राप्त करणे आवश्यक आहेत, त्यांना मूलभूत प्रशिक्षणादरम्यान बाहयवर्गामध्ये विविध प्रकारचे शारिरीक प्रशिक्षण देण्यात येते.
निवास व्यवस्था
पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची, तासगाव- सांगली येथे नवप्रविष्ठ पोलीस शिपाई यांचे करीता एकुण ०३ हॉस्टेल आहेत. हॉस्टेल क्र.१,२,३ येथे निवासगृह आहेत. तसेच हॉस्टेल मधील प्रत्येक रुम मध्ये ०४ नवप्रविष्ठ प्रशिक्षणार्थी पोलीस शिपाई यांची निवासाची व्यवस्था आहे.
भोजनगृह व्यवस्था
पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची येथे नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थी यांचे करिता शासकीय भोजनालय असून, त्यामध्ये प्रशिक्षणार्थी यांची नाष्टा व भोजनाची व्यवस्था आहे. भोजनालयामध्ये मेस मॅनेजर, सहायक मसे मॅनजेर, स्वयंपाकी व इतर मदतनीस तसेच आवश्यकतेनुसार कंत्राटी तत्वानुसार मुनष्यबळ उपलब्ध आहे.
खेळाचे मैदान
पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची तासगांव येथे बाहयवर्ग प्रशिक्षणामध्ये खेळांचा समावेश असुन नियमितपणे सायंकाळी खेळाकरीता खालील मैदाने उपलब्ध आहेत. पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची याठिकाणी असलेल्या मुख्य कवायत मैदान व फुटबॉल मैदान येथे रनिंग ट्रॅक उपलब्ध आहे. फुटबॉल मैदान येथे लांब उडी मैदान हे उपलब्ध असुन, व्हॉलीबॉल मैदान , कबड्डी मैदान हे मैदान वन विभागाच्या अधिपत्याखालील जमीनवर असून, सदरची जमीन वनविभाग कडून परवानगीने वापरण्यास घेण्यात आलेली आहे. त्या क्षेत्रास वन संज्ञा असे नाव देण्यात आलेले आहे. बॅडमिंटन करीता प्रत्येक हॉस्टेलच्या आतील भागातील मोकळयाजागेत बॅडमिंटन कोर्ट बनवण्यात आले आहे.
मुख्य कवायत मैदान स्टेडियम
पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची तासगांव सांगली येथे स्टेडियम असून त्याठिकाणी दिक्षांत संचलन समारंभ, प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन ध्वजारोहन कार्यक्रम होतात. त्या कार्यक्रमा दरम्यान अभ्यांगतांची बैठक व्यवस्था शेड मध्ये केली जाते.
व्यायामशाळा
पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची तासगांव सांगली येथे प्रशिक्षणार्थी, अधिकारी व अंमलदाराकरीता अत्याधुनिक व सुसज्ज व्यायामशाळा असुन त्याचे क्षेत्रफळ २१० चौ.मी. आहे. व्यायामशाळे मध्ये एकावेळी ३० व्यक्ती व्यायामशाळेचा वापर करु शकतात. सदर ठिकाणी कवायत शिक्षक यांचे मार्फतीने प्रशिक्षणार्थी यांना फिटनेस बाबत मार्गदर्शन केले जाते.
प्रोव्हिजन स्टोअर्स
पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची मध्ये प्रशिक्षणार्थी यांच्या दैनंदिनी करीत लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तू माफक दारात उपलब्ध आहेत. हे स्टोअर ना नफा ना तोटा या तत्वावर चालवले जाते.