इंडियन मेडिकल असोसिएशन मिरज यांच्या वतीने पोलिस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात आले.
आज दिनांक 20/08/2023 रोजी इंडियन मेडिकल असोसिएशन मिरज यांच्या वतीने पोलिस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात आले.सदर कार्यक्रमास मा.ना. श्री. सुरेश खाडे साहेब, कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सांगली,मा.खासदार श्री संजयकाका पाटील, मा.आमदार श्रीमती सुमनताई पाटील, प्राचार्य श्री धीरज पाटील सर, डॉ. नॅथनिअल ससे, अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन मिरज, डॉ. विनोद परमशेट्टी, डॉ. जीवन माळी, डॉ. रियाज मुजावर हे उपस्थित होते. सदर शिबीराचे उदघाटन मा.ना. श्री. सुरेश खाडे साहेब, कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सांगली शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्राचार्य श्री धीरज पाटील सर ह्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून उपस्थितांना प्रशिक्षण केंद्राची माहिती दिली. मा.आमदार सुमनताई पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करून, वैद्यकीय शिबीरामध्ये पोलीस अधिकारी , अंमलदार व त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी सेवा पुरविलेल्याबाबत प्रशंसा केली व पोलीस प्रशिक्षण केंद्राचा दर्जा उंचावण्यासाठी कटिबद्ध असलेबाबत मनोगत व्यक्त केले. मा. ना. श्री . सुरेशभाऊ खाडे साहेब यांनी त्यांचे भाषणात स्वर्गीय माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देऊन, प्रशिक्षण केंद्र अत्याधुनिक करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याची घोषणा केली.
सदर वैद्यकीय शिबिरामध्ये शिबिरास हजर असलेल्या व्यक्तींची सर्वंकष वैद्यकीय तपासणी, निदान व उपचार करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन मिरज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, भारती हॉस्पिटल मिरज, डॉ. गुलाबराव पाटील होमिओपॅथी हॉस्पिटल मिरज येथील एकूण 40 तज्ञ डॉक्टर हजर होते.सदर शिबिरामधून पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयीन कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय तसेच प्रशिक्षणार्थी असे एकूण 980 व्यक्तींची तपासणी व उपचार करण्यात आले. तसेच उपचारानंतर सहभागी व्यक्तींना केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशन , सांगली यांचे तर्फे मोफत औषधे वितरण करण्यात आले.
सदर वैद्यकीय शिबिराचे समनवय पोलीस प्रशिक्षण केंद्राचे पोलीस निरीक्षक श्री दत्ता कोळेकर यांनी केले. सदर कार्यक्रमास पोलीस प्रशिक्षण केंद्राचे उपप्राचार्य प्रशासन श्री उदय डुबल सर, उपप्राचार्य प्रशिक्षण श्री सुजय घाटगे सर, सत्र समन्वयक श्री श्रीकृष्ण हारुगडे , तसेच सर्व आंतरवर्ग व बाह्यवर्ग अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.