दिनांक 15/08/2023 रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आज दिनांक 15/08/2023 रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमवेळी मा. प्राचार्य श्री धीरज पाटील सर ह्यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले . सदरवेळी उपस्थित सर्व पोलीस अधिकारी , अंमलदार व प्रशिक्षणार्थी यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांनी उपस्थित अधिकारी अंमलदार व प्रशिक्षणार्थी यांना स्वातंत्रदिनाचे महत्त्व सांगून संबोधित केले व स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्यादिन निमित्ताने गुणवंत प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सदर कार्यक्रमास मानवंदना प्लाटून चे नेतृत्व राखीव पोलिस निरीक्षक श्री आनंद वरेकर यांनी केले. सदर कार्यक्रमास उपप्राचार्य प्रशासन श्री. उदय डुबल सर, उपप्राचार्य प्रशिक्षण श्री सुजय घाटगे सर, सत्र समन्वयक श्री हारुगडे, मंत्रालयीन कर्मचारी व प्रशिक्षणार्थी हजर होते.