
आरोग्य शिबिर
दिनांक 12/4/2025 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची तासगाव येथे माननीय पोलीस प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल मिरज, यांच्यामार्फत प्रिव्हेंटिव्ह ऑन्काॅलाॅजी विभागाकडून मोफत आरोग्य मार्गदर्शन करण्यात आले. सदरवेळी श्री सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटलच्या डाॅ. सौ. जयंती फाटक (Ph.d Medical Microbiology ) डॉ सविता ताम्हणकर डॉ रजनी चोपडे उपस्थित होत्या. यावेळी सर्व महिला पोलीस कर्मचारी/ अधिकारी यांना मार्गदर्शन करून त्यांच्या शंकेचे निरसन, गैरसमज व भीती दूर करण्यात आले. सदर आरोग्य शिबिरासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्रातील अंतरवर्ग बाह्य वर्ग अधिकारी अंमलदार हजर होते.
Latest News

14 Apr, 2025
आरोग्य शिबिर

14 Apr, 2025
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती

16 Aug, 2024