डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती दिन, १५ ऑक्टोबर हा “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा केला
आज दिनांक 17/10/23 रोजी प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती दिन, १५ ऑक्टोबर हा “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा केला जातो, याचेच औचित्य साधून पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची यांचेतर्फे ‘वाचन प्रेरणा दिन’ निमित्त बाबासाहेब पाटील विद्या मंदिर येळावी आणि पंचक्रोशी विद्यानिकेतन निमणी या प्रशालेमध्ये *”फिरते वाचनालय” हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी,यासाठी विविध प्रकारची पुस्तके विशेषतः स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, महान व्यक्तींची आत्मचरित्रे अशी २०० हून अधिक पुस्तके,ग्रंथ या शाळेतील मुलांना वाचन अनुभूती देण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली.याला विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सदर उपक्रमात पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरचीचे पोलिस निरीक्षक मानसिंग डूबल,सपोनि क्षीरसागर, सपोनि कोरे मॅडम तसेच पोलीस प्रशिक्षणार्थी यांनी सहभाग घेतला.