स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पोलीस प्रशिक्षण केन्द्र तुरची स्वच्छता अभियान उपक्रम.
दिनांक 01/10/2023 रोजी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पोलीस प्रशिक्षण केन्द्र तुरची ,ता. तासगाव, जिल्हा- सांगली, राज्य- महाराष्ट्र येथे मा. प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस प्रशिक्षण केंद्र परिसर, प्रशिक्षण भवन इमारत, मोटार परिवहन विभाग परिसर, प्रशिक्षणार्थी वसतिगृह परिसर, कर्मचारी निवासस्थान परिसर व हनमंतनगर पोस्ट- तुरची, ता- तासगाव, जिल्हा – सांगली हे गाव येथे स्वच्छता करण्यात आली. सदर स्वच्छता अभियान उपक्रमात प्रशिक्षण केंद्रामधील पोलीस अधिकारी, अंमलदार , मंत्रालयीन कर्मचारी व प्रशिक्षणार्थी असे एकुण 273 व्यक्तींनी सहभाग घेऊन उस्फूर्तपणे श्रमदान केले.